शब्द जैसे कल्लोळ। अमृतांचे।। या माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीची व आम्हा घरी धन...शब्दांचीच रत्ने! या जगद्गुरू राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या अभंगाची प्रेरणा घेऊन शब्दांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीतील मातृदेवो भवः, पितृदेवो भवः, आचार्य देवो भवः, वसुधैव कुटुंबकम, हे विश्वचि माझे घर या विचारातून सकारात्मक विचार करणारे युवा नेतृत्व निर्मिती करून एकविसाव्या शतकातील प्रगतिशील राष्ट्राच्या निर्मिती मध्ये योगदान देण्यासाठी शब्दधन सोशल फाऊंडेशन या संस्थेची स्थापना १२ डिसेंबर २०१८ रोजी करण्यात आली आहे.
संस्थेची संस्था नोंदणी अधिनियम,१८६० व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० या अन्वये नोंदणी करण्यात आली असुन नोंदणी क्रमांक रजि.नं.महा./१९२७/१८/एफ-५३२०५/पुणे हा आहे.
शब्दधन सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य ही संस्था नीति आयोग ( नॅशनल इंस्टीटयूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ) या भारत सरकारच्या संस्थेत नोंदणीकृत असून Unique ID:MH/2019/0240771 हा आहे.
भारत सरकार सूक्ष्म,लघु एवं मध्यम उद्यम मंत्रालय या विभागात संस्था नोंदणीकृत असून नोंदणी क्रमांक UDYAM-MH-26-0022799 हा आहे.
शब्द धन आहे, शब्द रत्ने आहे,
शब्द शस्त्रे आहे ,शब्द जीवन आहे ,
शब्द गौरव आहे ,शब्द पूजा आहे
शब्द देव आहे.
शब्दांच्या माध्यमातून माऊली ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु राष्ट्रसंत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा वारसा चालवणारा संपूर्ण विश्वावर विलक्षण प्रेम करणारा युवक घडावा यासाठी संस्था महाराष्ट्र राज्यामध्ये निरंतर कार्य करत आहे.