ध्येय
महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी भागातील १० वी व १२ वी च्या १ लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत करिअर मार्गदर्शन करणे.
शब्दांच्या माध्यमातून व्याख्यान, प्रेरणादायी कार्यशाळा, करिअर मार्गदर्शन कार्यक्रम, उद्योजकता विकास प्रशिक्षण, सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करूया या प्रबोधन कार्यातून सकारात्मक विचार करणारे युवा नेतृत्व निर्मिती करून एकविसाव्या शतकातील प्रगतिशील राष्ट्राच्या निर्मिती मध्ये उभारणीसाठी निरंतर योगदान देणे.
भारतीय संस्कृतीतील मातृदेवो भवः, पितृदेवो भवः, आचार्य देवो भवः, वसुधैव कुटुंबकम, हे विश्वचि माझे घर हे विचार प्रबोधन कार्यातून युवकांपर्यंत पोहचवणे.