शब्दधन व्यासपीठामध्ये समाजाच्या सर्व स्तरांमधील युवक, युवती, प्रबोधनकार, लेखक, शासकीय अधिकारी, प्राध्यापक , उद्योजक यांचा सहभाग अपेक्षित आहे. वय, व्यवसाय, शिक्षण, भाषा याच्यातील कुठलाही अडसर न बाळगता सर्वांनी यात सहभागी व्हावं.
शब्दधनच्या माध्यमातून खालील गोष्टी साध्य होतील:
- शिक्षण आणि सहकार्याला प्रवृत्त करणारे वातावरण
- विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी व्यासपीठ
- जनसंपर्काची उत्तम संधी
- वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवन समृद्ध करणे
- समाज घडवणे
- स्वतःचा आणि स्वतःतील नेतृत्वगुणांचा विकास
- महिलांना पाठबळ देणारी 'सपोर्ट सिस्टीम'
- सामाजिक प्रतिष्ठा आणि वैयक्तिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने, स्वतःला भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करता येईल असे मोकळे आणि सुरक्षित वातावरण.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शब्दधन व्यासपीठाचे सर्वांना आमंत्रण! शब्दधन सदस्य होण्यासाठी ९८९०१३२२१३ वर फोन करा!