उद्योजकता ही देशाची संपत्ती असते आणि अनेक तरुणांच्यामध्ये उद्योजक प्रवृत्ती दडलेली असते. या प्रवृत्तीला प्रेरणा दिली तर त्या तरुणांमधून चांगला उद्योजक जन्माला येतो, जो पुढे चालून देशाच्या संपत्तीत भर घालू शकतो. म्हणून शब्दधन सोशल फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने नवं जग-नव्या व्यवसायाच्या संधी उद्योजकता विकास हा उपक्रम राबवला जातो.
प्रशिक्षण कुणासाठी
- स्वयंरोजगार सुरु करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी (वयाचे / शिक्षणाचे बंधन नाही) / ज्यांनी नवा व्यवसाय सुरु केला आहे अशा महिला / बचत गटातील महिला/युवक/उद्योगजक
विषय
- व्यवसाय कसा निवडावा, गुंतवणूक क्षमतेनुसार नियोजन कसे करावे, नोंदणी कशी करावी, लायसन्स कोणकोणते लागतील, कागदपत्रे काय काय लागतात, व्यवसाय उभारणीचे टप्पे
- व्यावसायिकांना सेल्स, मार्केटिंग, जाहिरात, कस्टमर हॅण्डलिंग, बिजनेस मॅनेजमेंट
- व्यवसायाची सुरुवात कशी करावी, सेटअप कसा उभारावा, ब्रॅण्डिंग कसे करावे, मार्केटिंग सेल्स साठी टिप्स
- कमी गुंतवणुकीत सुरु करता येईल अशा भरपूर व्यवसायांच्या संधी
- व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक असलेल्या रजिस्ट्रेशन, टॅक्सेशन, प्रोजेक्ट रिपोर्ट्स, लायसन्सिंग, वेबसाईट डिझाईन, लोगो डिझाईन, ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन , सबसिडीसंबंधी माहिती
- फायनान्स कंपन्या, बँक यांचेशी टायअप करून उद्योजकांना कर्जप्रकरणी सहकार्य
- व्यवसायासाठी उपयुक्त असलेल्या कौशल्यांचे कोर्सेस
- व्यावसायिकांच्या मिटिंग आयोजित करणे. कार्यशाळा घेणे. व्यावसायिकांचे व्यवसाय वाढवण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून सहकार्य करणे.
महिला व्यवसाय प्रशिक्षण
|
|