शब्दधन सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थेच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय युवा गौरव पुरस्कार व SUPER 30 राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
राज्यस्तरीय युवा गौरव पुरस्कार सोहळा
आपणांस कळविण्यास विशेष आनंद वाटतो की, शब्दधन सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने दरवर्षी " राज्यस्तरीय युवा गौरव पुरस्कार सोहळा" आयोजित करण्यात येतो. राज्यातील कृषी,पर्यावरण-जल,निसर्ग संवर्धन,युवा संघटन,महिला सक्षमीकरण,पत्रकारिता, कला,सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रात आपल्या भरीव योगदानाने समाजाच्या विकासात मोलाचा वाटा देणाऱ्या युवकांच्या, कार्य करणाऱ्यांच्या कार्याच्या गौरव सलामी देण्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. पुरस्कार सोहळ्यात मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन कार्याचा गौरव करण्यात येतो.
पुरस्काराचे विभाग
- कृषि व उद्योग - प्रगतिशील शेतकरी /कृषि उद्योग / कृषि संशोधन / कृषि शिक्षण
- पर्यावरण व निसर्ग संवर्धन
- महिला / पत्रकारिता / युवा संघटन / कला क्रीडा / सामाजिक कार्य / शिक्षण व सेवा
वैयक्तिक प्रस्तावाकरिता कागदपत्रांची अनुक्रमणिका
- प्रस्ताव अर्ज
- परिचय पत्र
- संबंधित क्षेत्र निवडण्यामागची भूमिका
- कार्याचे फोटो/वृत्तपत्रातील प्रसिद्ध झालेले लेख,बातम्या
- काम करीत असलेल्या क्षेत्रातील भविष्यातील नियोजन(थोडक्यात)
- प्रस्तावाची भाषा - मराठी / इंग्रजी.
शब्दधन राज्यस्तरीय युवा गौरव पुरस्कार नामांकन अर्ज. नाव नोंदणी लिंकयेथे क्लिक करा
SUPER 30 राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार
आपणांस कळविण्यास विशेष आनंद वाटतो की, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
'शिक्षक' हे भावी पिढीचे शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. शिक्षक दिन हा आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस...शिक्षक दिनाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने
SUPER 30 राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गौरव पुरस्कार सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
आम्ही निवड करतो महाराष्ट्रातील असे 30 शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य जे आहेत आपल्या कार्याने SUPER 30, ज्यांनी घडवले आहेत असामान्य विद्यार्थी, ज्यांचे विचार देत आहेत विद्यार्थ्यांना प्रेरणा, जे आहेत भारताचे शिल्पकार अशा SUPER 30 उत्कृष्ट, गुणवंत शिक्षकांचा गौरव बारामतीमध्ये.......
SUPER 30 पुरस्कार सोहळ्यात मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र( सन्मानपत्र) देऊन कार्याचा गौरव करण्यात येतो.
प्रस्तावाकरिता कागदपत्रांची अनुक्रमणिका
- प्रस्ताव अर्ज
- परिचय पत्र
- शिक्षण क्षेत्र निवडण्यामागची भूमिका
- कार्याचे फोटो/वृत्तपत्रातील प्रसिद्ध झालेले लेख,बातम्या
- काम करीत असलेल्या क्षेत्रातील भविष्यातील नियोजन(थोडक्यात)
- प्रस्तावाची भाषा - मराठी / इंग्रजी.