‘स्टॅटिस्टा’ संस्थेच्या जागतिक सर्वेक्षणानुसार सध्या भारतात 40 कोटींहून अधिक नागरिक सोशल मीडियाचा नियमित वापर करतात. हीच संख्या 2023 पर्यंत जवळपास 44.80 कोटींचा टप्पा गाठणार आहे. 2020 मध्ये 60 कोटींहून अधिक भारतीय कोणत्या ना कोणत्या प्रकारे पूर्ण वेळ इंटरनेटचा वापर करत आहेत. हाच आकडा 2023 पर्यंत 67 कोटींपर्यंत जाईल. विकिपीडियानुसार, आपल्या देशात 65 टक्के नागरिक युवा वर्गात येतात. या दोन जमेच्या बाजू जगभरात सर्व क्षेत्रात शिखर गाठण्यास सक्षम आहेत.

शब्दधन सोशल फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करूया हा उपक्रम राबवला जातो.

शब्दधन फेसबुक पेजच्या माध्यमातुन विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती, अभ्यासक, प्रबोधनकार, कीर्तनकार, व्याख्याते, कलाकार दर रविवारी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत शब्दधन फेसबुक लाईव्ह उपक्रमाच्या माध्यमातून आॅनलाईन लाईव्ह मार्गदर्शन करतात.

शब्दधन सोशल फाऊंडेशन या संस्थेचे महाराष्ट्रभर शाळा, काॅलेज , विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती यांचे प्रबोधन कार्यासाठी व्हाट्सअप/ फेसबुक विविध गट कार्यरतआहे.

शब्दधन यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून शब्दधन आॅनलाईन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, शब्दधन आॅनलाईन खुली काव्यवाचन स्पर्धा या उपक्रमाचे दरवर्षी आयोजन केले जाते.

व्यावसायिक,दुकानदार,वकील,डॉक्टर,ब्युटीशिअन,आॅनलाईन व्यवसाय , स्टार्टअप्स ,सेल्स आणि मार्केटींग प्रोफेशनल्स,युट्युबर,ब्लाँगर्स, लघु आणि मध्यम उद्योजक,डीजीटल मार्केटिंगचा व्यवसाय/नोकरी करु इच्छीणार्या व्यक्तींसाठी संस्थेच्या माध्यमातून डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा या उपक्रमाचे आयोजन केले जाते.

डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा

  • डिजीटल मार्केटिंग म्हणजे काय?
  • सोशल मिडीयाचा तुमच्या व्यवसायासाठी वापर कसा करावा?
  • युट्युब मार्केटिंग ,वेबसाईट मार्केटिंग.
  • बिजनेस पेज कसे तयार करावे?
  • गुगल फाँर्म्स चा वापर.,लिड जनरेशन.
  • आपल्याला हव्या असलेल्या ग्राहकांचा अमर्याद स्त्रोत कसा मिळवायचा?
  • कमी बजेट मध्ये FB ADS कशा करायच्या?
  • फेसबुक वर आथवा ONLINE शॉपिंग स्टोर कसे सुरु करायचे?
  • आपल्या प्रोडक्टच्या प्रोफेशनल ईमेज डिजाईन,व्हिडीयो कसे तयार करायचे.
  • पोस्ट viral करून व्यवसायाची प्रसिद्धी कशी करायची?
  • पत्ता,वयोगट,शिक्षण,उत्पन्न,महिला/पुरुष,व्यवसाय या आधारे आपले ग्राहक कशे मिळवायचे ?
  • ऑनलाईन/डिजिटल पेमेंट कसे घ्यायचे?