आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने
शब्दाचीच शस्त्रे यत्ने करु
शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात परिवर्तन व प्रबोधन करण्याच्या उद्देशाने शब्दधन सोशल फाऊंडेशन , महाराष्ट्र राज्य. या संस्थेची स्थापना १२ डिसेंबर २०१८ रोजी करण्यात आली आहे. संस्थेची संस्था नोंदणी अधिनियम,१८६० व मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० या अन्वये नोंदणी करण्यात आली असुन नोंदणी क्रमांक रजि.नं.महा./१९२७/१८/एफ-५३२०५/पुणे हा आहे..
मिशन
आम्हा घरी धन...शब्दांचीच रत्ने! या जगद्गुरू राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे शब्दांच्या माध्यमातून व्याख्यान, प्रेरणादायी कार्यशाळा, करिअर मार्गदर्शन कार्यक्रम, उद्योजकता विकास प्रशिक्षण या प्रबोधन कार्यातून सकारात्मक विचार करणारे युवा नेतृत्व निर्मिती करून एकविसाव्या शतकातील प्रगतिशील राष्ट्राच्या निर्मिती मध्ये उभारणी साठी निरंतर योगदान देणे .
व्हिजन
- भारतीय संस्कृतीतील मातृदेवो भवः, पितृदेवो भवः, आचार्य देवो भवः, वसुधैव कुटुंबकम, हे विश्वचि माझे घर हे विचार प्रबोधन कार्यातून युवकांपर्यंत पोहोचवणे.
- लोककल्याणकारी ज्ञानाची निर्मिती आणि प्रसार करण्यासाठी कटिबद्ध तसेच समाज आणि राष्ट्र उभारणीस महत्त्व देणारे सर्व समावेशक नेतृत्व शब्दांच्या माध्यमातून विकसित करण्यासाठी निरंतर प्रयत्न करणे.
- ज्ञान निर्मिती आणि प्रसारासाठी योगदान देताना विद्यार्थी व शिक्षक यांना केंद्रबिंदू मानणारी व्यवस्था निर्माण करण्यासाठी सजग प्रयत्न करणे.
उद्दिष्टे
नैतिक आणि मूल्य-आधारित शिक्षणास प्रोत्साहन देणे तसेच राष्ट्रीय ऐक्य व विकासाची भावना वाढवणे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये जागतिक क्षमता विकसित करणे.
उद्योजकता प्रोत्साहित करण्यासाठी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅमव्दारे गावपातळीवर प्रशिक्षण देऊन कला कौशल्यसारख्या सुप्त गुणांचे अर्थार्जनामध्ये रुपांतर करणे.
शब्दधन बाल व युवा संस्कार या उपक्रमातून अध्यात्मिक बाल व युवा विकास संस्कार शिबिराचे आयोजन करणे.
संपूर्ण भारतात आरोग्य आणि निरोगीपणा राहावा यासाठी कार्य करणे