शब्दधन सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आपल्या सामजिक उत्तरदायीत्व कार्यांतर्गत सन २०१९ पासून महाराष्ट्रातील हुशार , गरजू, होतकरू विद्यार्थ्यांसाठी शब्दधन युवा शिष्यवृत्ती कार्यक्रम' राबवत आहे. या कार्यक्रमांतर्गत दरवर्षी इयत्ता १०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.
पात्रता:
- शिष्यवृत्तीसाठी अर्जदार विद्यार्थी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छीत असल्यास इयत्ता दहावीत (SSC), मान्यताप्राप्त बोर्ड परीक्षा-२०२० च्या निकालानुसार किमान ८५ % गुण प्राप्त असणे आवश्यक.
- कुटुंबाचे एकत्रीत वार्षिक उत्पन्न कमाल रु.१५००००/- पेक्षा जास्त नसावे
- अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्रातील असावा.
- विद्यार्थ्यांची व पालकांची उच्च शिक्षण घेण्याची व त्यात सातत्य ठेवण्याची दुर्दम्य इच्छा असावी तथा सहकार्याची हमी असणे आवश्यक.
युवा शिष्यवृती निवड प्रक्रियेच्या पायऱ्या:
- शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज असणे आवश्यक आहे.
- गुणवत्ता व इतर निकषावर अर्जाची छाननी.
- वैयक्तिक मुलाखत.
- निवड आणि शिष्यवृत्ती प्रदान.